
मोबाईलमध्ये एखाद्या व्यक्तीचा नंबर सेव्ह नसेल तरीही कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दिसणार आहे. देशभरात डिजिटल अटक आणि आर्थिक घोटाळे यांसारखे फसवे कॉल व सायबर गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना कोण कॉल करत आहे हे ओळखता येईल, ज्यामुळे त्यांना फसवे कॉल ओळखता येतील.
सरकारच्या नव्या सीएनएपी सिस्टममुळे हे सर्व शक्य होणार आहे. याची सध्या देशातील काही भागांत चाचणी सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी काही दिवस राबविल्यानंतर ती संपूर्ण देशात लागू केली जाईल. मोबाईलवर पह्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसण्यासाठी आता टकॉलरसारख्या थर्ड पार्टीची आवश्यकता लागणार नाही. जी व्यक्ती तुम्हाला कॉल करते त्या व्यक्तीचे आधारकार्डवरील नाव तुमच्या मोबाईलवर दिसेल. तुमच्या मोबाईलमध्ये हे नाव सेव्ह नसले तरीही ते मोबाईलवर ठळकपणे दिसणार आहे. या सिस्टमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे व्यक्तीचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले असले तरी त्याआधी त्याच्या आधारकार्डवरील नाव दिसेल.




























































