ऐतिहासिक सरदार वाघमोडे समाधी स्मारके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात कार्यरत असणारे सरदार वाघमोडे घराणे. याच सरदार वाघमोडे घराण्यातील वीरांची ऐतिहासिक, घुमटाकार समाधी स्मारके सोलापूर जिह्यातील माळशिरस – अकलूज रोडवर आहेत. हे वाघमोडे पाटील घराणे माळशिरसचे वतनदार होते. धनगरांच्या मौखिक परंपरांमध्ये सरदार वाघमोडे घराण्यातील वीरपुरुषांची, वाघमोडे घराण्याची थोरवी गायली गेलेली आहे. स्वराज्यातील महत्त्वाच्या 31 शिलेदारांची यादी देताना बखरकार कृष्णाजी आनंद सभासद यांनी सरदार जानराव वाघमोडे यांचा उल्लेख केला आहे. मराठेशाहीच्या इतिहासातही हिंदवी स्वराज्याला वाघमोडेंची मोलाची मदत लाभली असल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावरील औरंगजेबाचे संकट हनन करण्यातही सरदार वाघमोडेंनी मोलाचा वाटा उचललेला होता. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ याबाबत आढळतात. सरदार वाघमोडे घराणे हे चंद्रवंशीय (यादव कुळातील) असून, औरंगजेबाच्या काळात स्वराज्याच्या रक्षणासाठी या घराण्याने मोलाची कामगिरी बजावली होती. माळशिरसव्यतिरिक्त वाघमोडे सरदारांची समाधी पुरंदवडे, फोंडशिरस आणि लासुर्णे (इंदापूर) येथेही आढळते.