
कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा उशिराने धावण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे येणाऱ्या ट्रेन क्र. 11100 मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसला दोन तासांचा विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. रत्नागिरीला सायपांळी पाच वाजून 15 मिनिटांनी पोहोचणारी ही गाडी रविवारी तब्बल दोन तास 15 मिनिटे उशिराने म्हणजेच सात वाजून 30 मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात पोहोचली. पनवेल स्थानकाजवळ घेतलेल्या ब्लॉकचा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला होता. तेव्हापासून कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाडय़ांना वारंवार विलंब होत आहे.
























































