मुरुड येथून अल्पवयीन मुलीस पळवले

धाराशिव जिल्ह्यातील कोंड येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस मुरुड येथून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांनी या संदर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी कोंड येथून सकाळी 8:30 वाजता एस.टी.बसने मुरुड येथे शिक्षणासाठी आलेली होती. ती दररोज दुपारी 3:30 वाजता ती घरी परत येत असे, परंतु त्या दिवशी ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी मुरुड येथे येऊन नातेवाईक, मैत्रिणी यांच्याकडे चौकशी केली. पण मुलगी कुठेच सापडली नाही. तेव्हा मुलीला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या