
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनात धर्म स्वातंत्र्य विधेयकासह एकूण 19 विधेयकांना विधानसभेत तर विधान परिषदेत 4 विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, यापुढील पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकूण 20 दिवस कामकाज चालले असून जवळपास 143 तास 51 मिनिटे काम झाल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली.



























































