एआयचा धोका चिंताजनक, अक्षय कुमारप्रकरणी सुनावणीत हायकोर्टाने व्यक्त केले परखड मत

एआयद्वारे तयार केलेला कंटेंट इतका फसवा आणि अत्याधुनिक असतो की तो खरा आहे की बनावट हे कोणालाही समजणे कठीण असून ही चिंतेची बाब आहे, असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

अभिनेता अक्षय कुमारचा आवाज, फोटो, स्टाईल वापरण्यास मनाई करण्याचे आदेश देत न्या. आरीफ डॉक्टर यांच्या एकल पीठाने ही चिंता व्यक्त केली. अभिनेता अक्षय कुमारचे एआयद्वारे तयार केलेले पह्टो, व्हिडीओ बनावट आहेत हे ओळखता येत नाहीत. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न  

वाल्मिकी ऋषींबाबत विधान केल्याचा अक्षय कुमारचा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर होता. हा व्हिडीओ अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासाठी धोकादायक आहे. याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. मुळात हे सर्व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूनेच केले जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले

तत्काळ डिलीट करायला हवे

एआयद्वारे तयार केलेले बनावट व्हिडीओ, पह्टो तत्काळ सोशल मीडियावरून डिलीट करायला हवेत. जनहितासाठी हे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले.