सासऱ्याचे सूनेसोबत होते अनैतिक संबंध, विजेचा धक्का देत केली मुलाची हत्या

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील नाचणा गावात वडिलांनीच सूनेच्या मदतीने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या तपासणीसाठी पुरलला मृतदेह उकरण्यात आला. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला आहे.

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील नाचणा गावात राहणाऱ्या हिरालालचा 25 एप्रिल रोजी मृत्यू झाला. विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत कुटुंबियांनी त्याचा मृतदेहाचे दफन केले. घटनेनंतर 10 दिवसांनी हिरालालचा भाऊ भोमराज याने भावाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. भावाची पत्नी पारलेने तिच्या भावाच्या मदतीने हिरालालची हत्या केल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले होते.

नाचणा पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक हुकमा विश्नोई यांनी सांगितले की, हिरालालचा भाऊ भोमराज याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर 10 दिवसांनी हिरालालचेपुरलेले प्रेत तहसीलदाराच्या उपस्थितीत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्कयात आले. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. हिरालालची पत्नी पारलेचे सासरे मुकेश यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्या दोघांनी मिळून हिरालालची हत्या केल्याचे पोलीस तपासत उघड झाले.

पोलिसांनी पारलेला ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता तिने सासऱ्यांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. 25 एप्रिलला हिरालालला लिंबाच्या सरबतात झोपेच्या गोळ्या घालून प्यायला दिले. रात्री तो गाढ झोपेत असताना सासऱ्यांच्या मदतीने हिरालालच्या कानात विद्युत तार घातल्या आणि बटण चालू केले. त्यानंतर 15-20 मिनिटांनी हिरालालचा मृत्यू झाल्यानंतर तारा काढण्यात आल्या. त्यानंतर विजेचा धक्का लागून हिरालालचा मृत्यू झाल्याचा बनाव केला आणि त्याचे प्रेत पुरले. या प्रकरणी पारले आणि तिचे सासरे मुकेश यांना नाचणा पोलिसांनी अटक केली आहे.

1

आपली प्रतिक्रिया द्या