
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने 0.25 टक्के कपात केली आहे. बँकेची ही सलग तिसऱ्यांदा व्याजदरातील कपात आहे. कामगार बाजारातील मंदी आणि वाढलेल्या महागाईमुळे फेडरल बँकेनी व्याजदरात कपात केली आहे. बँकेच्या या कपातीच्या निर्णयानंतर व्याजदर 3.50 टक्के ते 3.73 टक्क्यांपर्यंत आला आहे. व्याजदरात कपात झाल्यामुळे कर्ज घेणे स्वस्त होईल आणि कंपन्या अधिक गुंतवणूक करू शकतील. गेल्या वर्षीही फेडरल बँकेने तीन वेळा व्याजदर कमी केले होते. सप्टेंबरमध्ये 0.25 टक्के, नोव्हेंबरमध्ये 0.50 टक्के आणि डिसेंबरमध्ये 0.25 टक्के व्याजदरात कपात केली होती.





























































