जगातील पहिल्या ‘एसएमएस’चा होणार लिलाव; 1 कोटी 71 लाखांची बोली   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील पहिला टेक्स्ट मेसेज 1992 साली पाठवण्यात आला होता. हा मेसेज एका व्होडाफोन कर्मचाऱयाने दुसऱया कर्मचाऱयाला पाठवला होता. ‘मेरी ख्रिसमस’ असे शब्द या मेसेजमध्ये लिहिले होते. या पहिल्या मेसेजचा लिलाव आता होणार असून 1 कोटी 71 लाखांची बोली लागली आहे.

29 वर्षांपूर्वी म्हणजेच 3 डिसेंबर 1992 रोजी जगातील पहिला एसएमएस ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ यांनी केला होता. नील पापवर्थ एक डेव्हलपर आणि टेस्ट इंजिनीअर म्हणून काम करत होते, त्या वेळी त्यांनी पॅम्प्युटरवरून हा एसएमएस त्यांचे दुसरे सहकारी रिचर्ड जार्विस यांना पाठवला होता. तेव्हा रिचर्ड जार्विस हे कंपनीचे संचालक होते. एसएमएस त्यांना ऑर्बिटल 901 हँडसेटवर पाठवण्यात आला होता. आता मोबाईल कंपनी व्होडाफोनने या एसएमएसचा लिलाव करायचे ठरवले आहे. पॅरिसमध्ये येत्या 21 डिसेंबर रोजी लिलाव होईल. लिलावातून जी काही रक्कम मिळेल ती यूएनएचसीआर- यूएन रिफ्यूजी एजन्सीला दिली जाईल, असे व्होडाफोनने सांगितले आहे.