नळेगाव येथे एक बंद घर फोडले तर एका घरावर सशस्त्र दरोडा

957
प्रातिनिधिक फोटो

चाकूर तालूक्यातील नळेगाव येथे दरोडेखोरांनी एक बंद घर फोडले. तर दुसऱ्या घरावर सशस्त्र दरोडा टाकला. चाकूचा धाक दाखवून 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लूटला. या दोन्ही घटनांसंदर्भात चाकूर पोलीस ठाण्याता अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नळेगाव येथे कपडे इस्त्री करणारे व्यावसायिक गुणवंत पांडूरंग तेलंग यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा ऐवज पळवला. माधव सूर्यकांत सावंत यांच्या घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलास चाकूचा धाक दाखवला आणि घरातील रोख 60 हजार रुपये, सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 10 हजारांचा ऐवज पळवला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लातूर येथून अप्पर पोलीस अधिकक्ष हिंमत जाधव, उपअधिक्षक विद्यानंद काळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सावंत यांच्या घरातून चोरुन नेलेला मोबाईल दरोडेखोरांनी रस्त्यात फेकून दिला होता. श्वान पथकाने त्या ठिकाणापर्यतचा माग काढला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या