महाशिवरात्रीला देवदर्शनास गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडले

महाशिवरात्रीला पतीपत्नी देवदर्शनासाठी गेल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. तब्बल 1 लाख 91 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना उदगीर शहरातील दत्तनगर भागात घडली आहे. याप्रकरणी उदगीर येथील योगीता नरेश उस्तरर्गे यांनी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात नमूद केले आहे की, त्या आपल्या पतीसोबत महाशिवरात्रीला देवदर्शनासाठी उदगीर तालूक्यातील जकनाळ येथील महादेवाच्या मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन करुन दुपारी 1 वाजता घरी परत आल्यानंतर घराचे मेनगेटमधून प्रवेश करत अज्ञात चोरट्याने दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट फोडून त्यामधील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागीने, साडेचार तोळ्याचे गोफ, दोन साखळ्यांमध्ये गुंफलेले गंठण, एक तोळयाचे मणीमंगळसूत्र असा एकूण 1 लाख 91 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अज्ञात व्यक्तीविरुध्द या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या