रस्त्यात अडवून लुटले; तिघांविरोधात गुन्हा दाखल

447

लातूरमध्ये ऊसतोड कामगारांचा मुकादम असणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून मारहाण करुन लुटल्याची घटना उदगीर तालूक्यातील वायगावजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात तीन मोटारसायकलस्वारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी विकास शंकर राठोड (रा. डिघोळ, ता. रेणापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. वायगाव शिवारात ऊसतोडीचे काम सुरु असल्याने ते तिथे जात होते. त्यांचा कामगारांचा जेवणाचा डबा देऊन मोटारसायकलने ते वायगावकडे निघाले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वायगावकडून मोटारसायकलवर तीनजण आले. त्यांच्या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हती. त्यांनी तक्रारदाराच्या मोटारसायकलसमोर त्यांची मोटारसायकल आडवी लावली आणि कट का मारलास म्हणून विचारणा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तक्रारदाराला लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. तक्रारदाराचा 10 हजार रुपयांचा मोबाईल व त्यांच्याजवळची रोख 5 हजार रुपये हिसकावून घेत पळून गेले. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात तीन मोटारसायकल स्वारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या