रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ लांबविली

विजेचे बिल भरण्यासाठी जंगलाच्या भागातून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील बोरमाळ लांबविणाऱ्या चोरट्याचा खेड पोलीस शोध घेत आहेत. ही घटना तालुक्यातील संगलट बौद्धवाडी येथे घडली.

खेड तालुक्यातील संगलट बौद्धवाडी येथील राहणाऱ्या बयाबाई रूके ही वृद्धा विजेचे बिल भरण्यासाठी संगलट बौद्धवाडी ते संगलट मुस्लिम मोहल्ल्याकडे जंगलाच्या भागातून पायी जात होती. वाटेत एका अनोळखी युवकाने त्यांना दापोलीत जाण्याचा रास्ता विचारला. बयाबाई त्याला सांगत असतानाच त्या अनोळखी युवकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ खेचून पलायन केले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या