
गर्दीचा फायदा घेत पीएमपीएल बसप्रवास करीत असताना चोरट्यांनी तरूणाच्या खिशातील 70 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खराडी ते पुणे-नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी संदीप सुरवसे (वय 33, रा. उखळी, बुलढाणा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शनिवारी सकाळी मित्राला 70 हजारांची रक्कम देण्यासाठी बुलढाण्याहून खराडीत आले होते. त्यानंतर ते पीएमपीएल बसने खराडी बायपास ते पुणे-नगर असा प्रवास करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 70 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस नाईक एच. के. पठाण तपास करीत आहेत.



























































