रत्नागिरीत दहा लाख रुपयांची चोरी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

घराच्या बांधकामाचे ठेकेदारला द्यायचे दहा लाख रूपये बेडरूममधून चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली आहे.

पार्थ आंबुलकर, वय २८ रा. शिवाजीनगर याने चोरीची फिर्याद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. आंबुलकर यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. बांधकामाचे १० लाख रूपये ठेकेदाराला द्यायचे होते. ते पैसे पार्थ याने त्याच्या वडीलांच्या बेडरूममधील बेडच्या खणात ठेवले होते. तेथून दहा लाख रुपये चोरीला गेले. आंबुलकर यांच्या घरात असलेली मोलकरीण मनिषा येडगे हिने ते चोरल्याची फिर्याद पार्थ आंबुलकर याने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.