दाताळा येथील जनक जिनिंगमध्य़े एकविस लाखाची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । मलकापूर (जि.बुलढाणा)

दाताळा येथील जनक अ‍ॅन्ड जिनिंग प्रेसींगच्या कॅशकॅबीन मधील टेबलचे दोन ड्रॉवर मध्ये ठेवलेले एकविस लाख चाळीस हजार सहाशे साठ रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २ एप्रिल सायंकाळी सात वाजता ते ३ एप्रिल सकाळी दहा वाजेदरम्यान घडली.

मलकापूर येथील भरत विनोद मुंधडा यांचे दाताळा नजीक जनक जिनिंग आहे. या जिनींगच्या कॅशकॅबीन मधील टेबलाचे ड्रॉवर तोडून अज्ञात चोरट्याने ड्रॉवर मधील एकविस लाख चाळीस हजार सहाशे साठ रुपये चोरून नेल्याची माहिती कॅशियर भुषण चांडक याने दिली. यावरुन भरत मुंधडा यांनी याबाबतची फिर्याद मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आज अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.उप.नि. प्रमोद सोनवणे करीत आहे.