
धकाधकीच्या जीवनात, तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हृद्यविकाराचा अॅटॅक होण्यापूर्वी, शरीर काही संकेत देते. या संकेतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तणावपूर्ण जीवनाचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. हृदयविकाराचा झटका आता केवळ वृद्ध लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो तरुणांनाही प्रभावित करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही, तर तो येण्यापूर्वी शरीर आपल्याला अनेक संकेत देते. पण आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही.
छातीत सौम्य वेदना किंवा जळजळ: कोणत्याही कारणाशिवाय छातीत वारंवार जळजळ, जडपणा किंवा दाब जाणवत असेल, तर ती सामान्य गॅसची समस्या असू शकत नाही. हे हृदयाच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे: तुम्हाला रोजची छोटी-छोटी कामे करतानाही खूप थकवा जाणवत आहे. शरीरात एक विचित्र कमजोरी जाणवत असेल, तर हे हृदयापर्यंत रक्त योग्यरित्या पोहोचत नसल्याचे लक्षण असू शकते.
श्वास घेण्यास त्रास: पायऱ्या चढताना किंवा कसरत न करताही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते हृदयाची स्थिती बिघडत असल्याचे दर्शवू शकते. हृदयविकाराच्या काही दिवस आधी ही लक्षणे दिसू शकतात.
जास्त घाम येणे: कोणत्याही कारणाशिवाय वारंवार घाम येत असेल तर ते हलके घेऊ नका. हे शरीरातील काही आपत्कालीन परिस्थितीचे लक्षण असू शकते.
मान, जबडा किंवा हात दुखणे: हृदयविकाराचा झटका फक्त छातीत दुखण्यापुरता मर्यादित नाही. ही वेदना मान, जबडा, खांदा किंवा डाव्या हातापर्यंत पसरू शकते.
अस्वस्थ आणि चिंताग्रस्त वाटणे: हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणाशिवाय चिंताग्रस्त, अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटते. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर, आता सावधान राहणे हे खूप गरजेचे आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)