महिलांनो आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा

 

आपल्या जीवनशैलीत संबंधित आजारांचा धोका खूप वाढला आहे. निरोगी राहण्याचे एकमेव सूत्र म्हणजे निरोगी आहार. या आहारात बिया महत्त्वाची भूमिका बजावतात. बिया पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत करतात. आता प्रश्न असा आहे की तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? निरोगी राहण्यासाठी महिलांनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा?

चहामध्ये पुदिन्याची पाने घातल्यावर मिळतील हे आश्चर्यचकीत करणारे फायदे

चिया सीडस्: चिया सुपरफूडच्या श्रेणीत येतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. या बियांचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात आणि पचनसंस्था निरोगी राहते.

अळशी: अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आणि लिग्नान्स असतात. लिग्नान्स हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. या बिया खाल्ल्याने हार्मोनल असंतुलन कमी होते, हृदयरोगांचा धोका कमी होतो, बद्धकोष्ठता दूर होते आणि त्वचेचा पोत सुधारतो.

Planting Tips – सुकलेल्या झाडांना जीवदान देण्यासाठी किचनमधील ‘या’ वस्तूंचा वापर करा, वाचा

भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे सर्व घटक निरोगी राहण्यास मदत करतात. दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने चांगली झोप येते. मूड स्विंग कमी होतो. तसेच हृदयरोग टाळता येतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

सूर्यफुलाच्या बिया: सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई, मॅग्नेशियम आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. म्हणून, या बियांचे सेवन केल्याने हृदयरोगांचा धोका कमी होईल, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील, त्वचा देखील निरोगी राहील.

तीळ: तीळ कॅल्शियम, लोह आणि जस्तने समृद्ध असतात. म्हणून या तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशक्तपणा टाळता येतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, केस निरोगी राहतात आणि हृदयाचे आरोग्य राखता येते.