
साध्या पाण्यात काही महत्त्वाच्या वस्तू घातल्यास, आपल्याला आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे फायदे होतात. पिण्याचे पाणी काही वस्तू घातल्यावर, आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे बनते. आपल्याला पोटात जडपणा जाणवत असेल, बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्येने त्रास होत असेल, तर फक्त साधे पाणी पिणे पुरेसे नाही. दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी काही नैसर्गिक गोष्टी घालून कोमट पाणी प्यायले तर ते पोट आणि पचनसंस्थेची स्वच्छता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.
लिंबू आणि मध – अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळून एक ग्लास कोमट पाणी पिल्याने पोटातील घाण काढून टाकण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्याने, आम्लता कमी होण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेवर उजळपणा देखील येतो.
Health Tips – फक्त थेंबभर ‘या’ तेलामुळे तुम्हाला मिळतील आरोग्यवर्धक फायदे
तूप– एक चमचा देशी तूप कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने आतडे स्वच्छ होण्यास मदत मिळते. तसेच शौचासही साफ होते. तूपामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्यही सुधारते. आतड्यांची हालचाल सुधारते, पोटात साचलेली घाण बाहेर पडते. उच्च कोलेस्ट्रॉल किंवा बीपी असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते सेवन करावे.
इसबगोल – एक चमचा इसबगोल कोमट पाण्यात मिसळून पिल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते. त्यात भरपूर फायबर असते, आतडे स्वच्छ करण्यास मदत होते, पोट हलके आणि स्वच्छ वाटते.
बडीशेप आणि जिरे – गरम पाण्यात बडीशेप किंवा जिरे उकळवा आणि हे पाणी गाळून घ्यावे. हे दोन्ही मसाले पचन सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत. आम्लता आणि पोटफुगीत या पाण्यामुळे खूप आराम मिळतो. यामुळे पचनशक्ती वाढते वात आणि पित्त दोष संतुलित राहतात.
साधे पाणी पिणे निश्चितच फायदेशीर आहे, परंतु जर त्यात लिंबू, मध, तूप, इसबगोल किंवा बडीशेप-जिरे यांसारखे नैसर्गिक घटक मिसळले तर पोटाची स्वच्छता आणि पचनशक्ती दुप्पट होते. हे घरगुती उपाय केवळ सोपे नाहीत तर शरीराला आतून निरोगी आणि हलके वाटण्यास मदत करतात.