
दररोज खाल्ले जाणारे पदार्थ देखील आपल्या हृदयाला नुकसान देऊ शकतात. आपण या गोष्टी कधी कधी नाश्त्यात,किंवा स्वयंपाकात वापरतो. हृदयरोग आज जगात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, धूम्रपान, लठ्ठपणा, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव, तसेच वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी ही मुख्य कारणे आहेत.
खाद्य तेलाचे सेवन

मका, सोयाबीन, सूर्यफूल आणि राई तेल यांसारख्या बियाण्यांच्या तेलांचा स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तेलांमध्ये ओमेगा-६ फॅटी अॅसिड असतात, जे हृदयाच्या धमन्यांचे नुकसान करू शकतात. या तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ वाढू शकते. जे लोक जास्त बियाण्यांच्या तेलांचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
शुगर फ्री पदार्थ

आपल्याला अनेकदा असे वाटते की शुगरफ्री पदार्थ हृदयासाठी चांगली असतात. मात्र यामध्ये कृत्रिम गोड पदार्थ असतात, जे आतड्यांतील बॅक्टेरिया आणि इन्सुलिनच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात. कृत्रिम गोड पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते.
वेगवेगळ्या चवीचे योगर्ट

योगर्टमध्ये साखर, कृत्रिम चव आणि संरक्षक असतात जे त्यांची चव आणि रंग वाढवतात. योगर्टचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो, शरीरातील ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते आणि वजन कमी करण्यास देखील अडथळा येऊ शकतो.
व्हेजीटेबल चिप्सचे सेवन

बरेच लोक व्हेजीटेबल चिप्सचे सेवन करतात, त्यांना एक निरोगी पर्याय मानला जोतो. या चिप्समध्ये बियांचे तेल असते, ज्यामुळे जळजळ होऊ शकते आणि हृदयाच्या धमन्यांचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर या चिप्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब वाढवते.


























































