
दिवसभर चपात्या मऊ आणि ताज्या ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. पीठ व्यवस्थित मळण्यापासून ते चपात्या झाकून ठेवण्यापर्यंत आपण काही महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करणे गरजेचे आहे.
चपात्या आपल्या आहारातील प्रमुख घटक आहेत. परंतु अनेकदा चपात्या या वातड होता किंवा कडक होतात. कोरड्या चपात्या खातानाही मजा येत नाही.
चपातीचे पीठ मळताना कोमट पाण्याने मळून घ्या. पीठ मळण्यासाठी कोमट पाणी किंवा दूध वापरा. पीठ मळल्यानंतर ते ओल्या कापडाने झाकून ठेवा आणि किमान 15-20 मिनिटे राहू द्या. पीठ मळून ठेवल्यामुळे ग्लूटेन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे चपाती मऊ होतात. शिवाय चपाती लाटायला देखील सोपी होते.
चपातीचे पीठ मळाताना पीठात तेल किंवा तूप घालावे. यामुळे पीठ मऊ होते आणि सहज लाटताही येते.
पीठात तेल किंवा तूप घालल्याने चपात्या मऊ होतात. एका पीठाच्या गोळ्यासाठी एक किंवा दोन चमचे तेल पुरेसे आहे.
चपाती आतून फुगलेल्या आणि मऊ राहण्यासाठी मध्यम आचेवर भाजाव्यात. जास्त करपवु नयेत.
चपाती भाजून झाल्यानंतर लगेच त्यावर तूप किंवा बटर लावा. यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि त्या मऊ आणि चवदार बनतात.
आरोग्यासाठी हा पांढरा पदार्थ आहे उत्तम पर्याय, निरोगी हृद्यासाठी सर्वोत्तम






























































