विंटेज कार चोरीचा प्रयत्न 

वांद्रे येथे चोरटय़ाचा विंटेज कार चोरीचा प्रयत्न फसला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. वांद्रे येथे राहणाऱ्या तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या तीन विंटेज कार आहेत. शेजारी राहणाऱ्या एकाने त्यांना मेसेज करून त्याच्या विंटेज कारजवळ दोन तरुण संशयास्पद फिरत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदार या खाली गेल्या तेव्हा एक तरुण त्याच्या विंटेज कारमध्ये बसला होता. तक्रारदार यांनी त्या दोघांचा पह्टो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक जण पळून गेला. काही वेळानंतर पुन्हा ते गाडीजवळ उभे असल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

बँक कर्मचाऱ्याची फसवणूक

गुंतवणुकीच्या टास्कच्या नावाखाली ठगाने अंधेरीत राहणाऱ्या बँक कर्मचाऱ्याची 7 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार यांना टेलिग्राम अॅप्सवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यात 120 रुपये आले. त्यानंतर त्यांना जास्त पैशाचे आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली.