
देवाच्या काठीला आवाज नसतो, असंही म्हटलं जातं. त्याचा पूरेपूर प्रत्यय देणारी घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. कोरबा येथे असलेल्या मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचा हात दानपेटीमधे अडकला. त्यामुळे चोर आणि त्याचा हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा साथीदार, असे दोघे अगदी सहज पोलिसांच्या हाती सापडले.
दोन चोर हनुमान मंदिरात चोरीसाठी शिरले होते. त्यांनी दानपेटीतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका चोराचा हात दानपेटीत फसला. खूप प्रयत्न करूनही तो हात बाहेर काढू शकला नाही. लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याचदरम्यान चोराने कसाबसा हात दानपेटीतून सोडवला होता. पण लोकांनी बाहेरून मंदिराचे दार बंद केल्याने त्याला पळता येईना.























































