पुणे- कर्वेनगरमध्ये चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले, 1 लाख 72 हजारांचा ऐवज लंपास

372

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरात चोरट्यांकडून घरफोड्यांचे सत्र कायम ठेवले आहे. बंद घराची रेकी करुन चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडल्याची घटना  कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत घडली आहे. त्यापैकी एका घरातून 1 लाख 72 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी पांडुरंग शिंदे (वय 31, रा. हिंगणे होमकॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग एका खासगी कंपनीत कामाला असून कर्वेनगरमधील हिंगणेहोम कॉलनीत  राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी ते कामानिमित्त बाहेर गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून 1 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्याशिवाय त्यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्येही चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, त्याठिकाणी कोणीही राहायला नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या