पुजाऱ्याचा खून करून दानपेटी पळवली, केजमधील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

केज येथील रेणुकादेवीच्या मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून अज्ञात चोरट्यांनी दानपेट्या फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दहिफळ वडमाऊली केज येथे रविवारी मध्यरात्री ही चोरी घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रामलिंग महादेव ठोंबरे  (55, रा.दहिफळ वडमाऊली) असे मयत पुजाऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ते गावातीलच दहिफळ वडमाऊली देवीच्या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून पुजारी म्हणून सेवा करत होते. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात जाऊन त्यांच्या डोक्यात दगड मारून जागीच ठार केले. त्यानंतर दानपेट्या फोडून देणगीची रक्कम चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास केज पोलीस करत आहेत.