इटलीत 95 कोटींच्या पेंटिंग्ज चोरट्यांनी पळवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीतील पार्मा शहरातील एका संग्रहालयातून अवघ्या तीन मिनिटांत तीन पेंटिंग्ज चोरटय़ांनी पळवल्या. या पेंटिंग्सची किंमत 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 90 ते 95 कोटी रुपये इतकी होती. चोरांनी तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात ही चित्रे उचलली आणि संग्रहालयाच्या बागेतून पळ काढला. ही चोरी एखाद्या संघटित टोळीने केली असावी, असा अंदाज संग्रहालयाला आहे. परंतु, चोरी झाल्यानंतर यासंबंधी संग्रहालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातही चोरांनी सुमारे 101 दशलक्ष डॉलरचे दागिने आणि इतर वस्तू चोरल्या होत्या