
सामना ऑनलाईन । लंडन
युनायटेड किंगडमच्या जेरेण्ट थॉमस याने टूअर दी फ्रान्स ही प्रतिष्ठेची सायकल जिंकण्याचा मान संपादन केला. ख्रिस वूम्स व ब्रॅडली विगीन्स यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा जेरेण्ट थॉमस हा युनायटेड किंगडमचा तिसरा सायकलपटू ठरला हे विशेष. जेरेण्ट थॉमस हा टीम स्काय या संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. २०१५ सालापासून सलग चौथ्यांदा टीम स्काय या संघाने प्रतिष्ठेची शर्यत जिंकण्याचा मान मिळवला आहे.




























































