
नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱयांना आता बुस्टर डोस तीन महिन्यांनी घेता येणार आहे. केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. बुस्टर डोस घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी को-विन ऍपवर लवकरच योग्य त्या सुधारणा करून ते अद्ययावत केले जाणार आहे. यामुळे व्हिसा अपलोड करण्याच्या कटकटीपासूनही सुटका होणार आहे. परदेशात जाणाऱयांसाठी बुस्टर डोसचा कालावधी कमी करावा, अशी मागणी देशभरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी सरसकट सर्वांना बुस्टर डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.

























































