
बिहारमधील मुझफ्फरपूरच्या मरवनमध्ये राहणाऱ्या झूमन यादव नावाच्या मजुराच्या खात्यात हजारो कोटींची रक्कम आली. एवढी मोठी रक्कम बँक अधिकाऱ्यांना मोजणे कठीण झाले. एका सामान्य मजुराच्या बँक खात्यामध्ये अचानकपणे कोटय़वधी रुपये जमा झाल्याचे बँक प्रशासनाला समजताच त्याचे बँक अकाऊंट गोठवण्यात आले. सायबर सेलनेही तपास सुरू केला आहे. बँक खाते गोठवल्यामुळे झूमनच्या अडचणीत वाढ झाली आहे. झूमन मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. तो सध्या सुट्टी घेऊन आपल्या घरी आलेला आहे. त्याच वेळी हा प्रकार घडला.