
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अवास्तव दराने नारायणगाव येथे जमीन खरेदी केल्याप्रकरणी तसेच बाजार समितीतील सुरू असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज जुन्नर येथील शिवनेरीच्या पायथ्यापाशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाजार समिती आवारापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माउली खंडागळे यांच्यासह भाजप नेत्या आशाताई बुचके, देविदास दरेकर, योगेश पाटे, संतोष चव्हाण, भास्कर घाडगे, प्रसन्ना डोके, शरद चौधरी, मंगेश काकडे, सचिन वाळुंज, शेतकरी नेते तानाजी तांबे, रघुनाथ लेंडे, प्रभाकर बांगर, नेताजी डोके, संभाजी काळे, बाबा परदेशी, रामभाऊ वाळुंज, पापा खोत, अतुल भांबेरे, संतोष वाजगे, मोहन बांगर, ज्योत्स्ना महाबरे, प्रियंका शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन घोलप, शांता यादव, सुरेखा गांजाळे, संतोष घोटणे, सुनील चव्हाण, श्रीराम गाढवे, महेश शेळके, राजू चव्हाण, प्रमोद खांडगे, डॉ. बाबा डुंबरे, गणेश औटी आदी सहभागी झाले होते.
आशाताई बुचके, प्रभाकर बांगर, संतोष चव्हाण, माउली खंडागळे प्रियंका शेळके, मोहन बांगर, योगेश पाटे, भास्कर घाडगे आदी पदाधिकाऱ्यांनी सभापती संजय काळे यांच्या विरोधात टीका केली. सचिन वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले, तर रघुनाथ लेंडे यांनी आभार मानले.