
सामना प्रतिनिधी । राहाता
अवघ्या एक दोन दिवसावर ऊसाची तोड येऊन ठेपलेली असताना साकुरी येथील शेतकरी संजय बाळकृष्ण भणगे यांच्या शेतातील तीन एकर ऊस व त्यामधील ड्रीप पाईप लाईन जळून खाक झाल्याची घटना सोमवार दि 1 जानेवारी 2019 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. वेळीच राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत चे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने भीषण आग आटोक्यात आली अन्यथा उर्वरित उसाचे क्षेत्रही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते.
साकुरी हद्दीत संजय बाळकृष्ण भणगे यांची शेतजमीन असून सर्व्हे नंबर 357 मधील शेतात पाच एकर ऊसाचे पीक आहे. कारखान्याकडून एक दोन दिवसात या उसाला तोड येणार होती कारखान्याने उस तोडून नेण्याअगोदरच सोमवार दि. 1 जानेवारी 18 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास या उसाला भीषण आग लागली शेतमालक संजय भणगे यांना घटना समजताच ते घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत आग मोठी भडकली होती त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधल्यानंतर काही क्षणातच राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत चे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगामी आटोक्यात आणून आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत उसातील ड्रीप च्या पाईप लाईन जळून गेल्या आहेत या आगीत उसाचे पीक व ड्रीप जळाल्याने शेतकरी संजय भणगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आगीचे कारण मात्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते यापूर्वीही या परीसरात उसाला आग लागल्याची घटना घडली होती या परीसरात उसाला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने त्यामागचे कारणे शोधणे गरजेचे असून उस जळीतांच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
































































