बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या भावडांसह तिघांना अटक

शहरातील विविध भागात पीएमपीएल बसद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा भावडांसह तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. राहूल बाबू गायकवाड (वय – 30), सनी बाबू गायकवाड (वय – 32, दोघेही रा. मुंढवा ) आणि गुंडप्पा हनुमंत कवलदार (वय – 31, रा. मुंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी खराडी बायपास परिसरात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार दीपक भुजबळ आणि सुरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, एपीआय संदीप जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, दीपक भुजबळ, सुरेंद्र साबळे, प्रवीण भालचिम, राकेश खुणवे, अशोक शेलार, सागर वाघमारे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या