मॅनहोलवरील झाकण चोरणाऱ्या तिघांना अटक

ऐन पावसाळ्य़ात रस्त्यातल्या मॅनहोलवरील लोखंडी झाकणे चोरून पसार होणाऱया तिघांना माटुंगा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्या तिघांनी शिताफीने 15 लोखंडी झाकणे चोरली. ती झाकणे विकण्याआधी पोलिसांनी तिघांना उचलून पाच झाकणे हस्तगत केली.

माटुंग्यातील निर्मनुष्य असणाऱया ठिकाणी रात्रीच्या सुमारास मॅनहोलवरील लोखंडी झाकणे चोरीला जात होती. महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील मॅनहोलवरील झाकण चोरीला गेल्याने तशी तक्रार माटुंगा पोलिसांकडे देण्यात आली होती. तपासाअंती झाकण चोर हे शिवडी दारूखाना परिसरात असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून सेवलमनी निवेल (27), मनोज कृष्णमूर्ती (23), शरद कुमार सिल्वा (23) अशा तिघांना अटक केली.