नगरमध्ये घरफोडी करणाऱ्या तीनजणांना मुद्देमालासह अटक ; एलसीबीची कारवाई

नगर जिल्ह्यामध्ये सध्या घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. घरफोडी करुन चोरी करणारे तीनजणांना स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपींमध्ये समीर खाँजा शेख (वय 22, रा.सबजलचौक,नगर), परवेज महेमुद्द सय्यद (वय 19, रा.भांबडगल्ली, भोसले आखाडा, नगर), गणेश उर्फ गौतम संजय भंडारी (वय 20, रा.शिवाजीनगर, कल्याणरोड,.नगर) यांचा समावेश आहे.

सारस-नगररोडवरील भाजीमार्केट समोरील सौरभ बेकर्स पाँइट हे दुकान 10 फेब्रुवारीला अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन मोबाइल व रोख रक्कमेसह 55 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. याबाबत सलीम अलीम अन्सारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन समीर शेख याला पकडले. त्याने सुरुवातीला उडावाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच, परवेज सय्यद व गणेश भंडारी आम्ही मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या माहितीवरुन सय्यद व भंडारी याचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 5,500 रुपयांचे दोन मोबाइल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली 50 हजार रुपयांची सुझुकी अँक्सेस असा 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीचे सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पोना रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या