महिलेवर अत्याचाराच्या आरोपावरून उरणमध्ये तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेवर अत्याचार करुन त्याची वाच्यता केल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पीडीतेच्या तक्रारीनंतर तत्काळ कारवाई करीत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनुसार करंजा- उरण येथे सदर पीडित महिला एकटी राहाते. घरी एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्ती घरात घुसून अजिंक्य दाभोळकर, वैभव कोळी, विश्वनाथ गायकवाड यांनी अत्याचार केले. याबाबत कोणास सांगू नये यासाठी पीडितेला शिवीगाळ करून त्यांचा अश्लील व्हिडीओ काढल्याचे सांगत तो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी उरण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दाखल घेत उरण पोलिसांनी तीनही आरोपींना तत्काळ अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आहेर( गुन्हे) हे करीत आहेत.
.