नवाब मलिकांच्या सुटकेसाठी तीन कोटी मागितले, मुलाची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी एका व्यक्तीने तीन कोटी रुपये मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मलिक यांचा मुलगा आमीर मलिक यांनी मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. इम्तियाज असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात इम्तियाजने तीन कोटी रुपये बिटकॉइनच्या स्वरूपात मागितले आहेत. यासंबंधीचा कॉल आल्यानंतर आमीर मलिक यांनी तत्काळ विनोबा भावे पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता दुबईवरून त्यांना यासंबंधी कॉल आल्याचे सांगण्यात येते.