साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंका पुन्हा हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । कोलंबो 

श्रीलंकेच्या कलमुनाई या शहरात तीन बॉम्बस्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलाने हाती घेतलेल्या शोध मोहिमेच्या वेळी हे स्फोट झाले आहेत. या स्फोटात जीवीतहाणी झाल्याचे वृत्त नाही.

गेल्या आठवड्यात श्रीलंकेतील कोलंबो शहरात झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटात 321 जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसने घेतली आहे. तसेच अमेरिकेच्या मित्रपक्षाला आम्ही टार्गेट करणार असेही इसिसने म्हटले आहे.