पनवेलमधील तीन पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गुरुनाथ म्हात्रे (शहरप्रमुख, खारघर), गणेश म्हात्रे (विभागप्रमुख, प्र. क्र. 1 तळोजा-ओबे), संतोष म्हात्रे (माजी सरपंच पिसारवे) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

संगीता जगताप यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबईतील विभाग क्र. 11 मधील शाखा क्र. 196 च्या महिला शाखा संघटक संगीता जगताप यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती  देण्यात आली आहे.