फटका गँगच्या तिघांना अटक

447

लोकलमध्ये प्रवाशांच्या हातावर फटका मारणाऱ्या तिघांना अंधेरी आणि दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. इम्रान ऊर्फ उल्ली अजीज चोऊस, रिहान अस्लम कुरेशी आणि शामकुमार रमेशकुमार ऊर्फ छेत्री अशी या तिघांची नावे आहेत.

वसई येथे राहणारे तक्रारदार हे जुलै महिन्यात लोकलने अंधेरीला येत होते. ते दरवाजात फोनवर बोलत उभे होते तेव्हा विलेपार्ले-अंधेरीदरम्यान त्यांच्या हातावर अज्ञात व्यक्तीने फटका मारला. त्या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शोधमोहीम सुरू असतानाच बुधवारी इम्रान आणि रिहानला अंधेरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. ते न्यायालयीन कोठडीत आहेत तर फटका मारणाऱया सराईत चोरटय़ाला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली.

मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांचे पथक सायन- कुर्लादरम्यान फटका पॉइंट गस्तीला होते तेव्हा पोलिसांनी सापळा रचून छेत्रीला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात बोरिवली, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले. प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्यांना जखमी करणाऱयाविरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अशा चोरटय़ावर पोलीस गुन्हे दाखल करतात.

आपली प्रतिक्रिया द्या