
एटीएम मशीनवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना युनीट एकने सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथून ताब्यात घेतले. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती पथकाला मिळाली. मात्र, टोळके पसार झाले होते.
संबंधित टोळीतील आरोपी मित्राला भेटण्यासाठी माणिकबाग परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे यांनी केली.



























































