
मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडला. या समारंभात नवनिर्वाचित न्यायमूर्तींनी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या उपस्थितीत गोपनीयतेची शपथ घेतली त्यामुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 69 झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांची 28 जुलै रोजी शिफारस केली होती. त्यावर गेल्या आठवडयात केंद्र सरकारने नियुक्ती बाबत अधिसूचना काढली. अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज हायकोर्टात आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित न्यायमूर्तींच्या शपथविधी नंतर उच्च न्यायालयात आता 69 न्यायमूर्ती झाले आहेत.