
अलिबागमध्ये वराहअवतार आणि लक्ष्मीच्या पुरातन मूर्तींची तस्करी करणार्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांना खबर मिळाली होती. त्यांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या.
ठाणे पोलीस संबंधित आरोपींच्या शोधात होते. आरोपींकडे वराहअवतार आणि लक्ष्मीची पितळ्याची पुरातन मूर्ती होत्या. ठाणे पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. तसेच्य त्यांच्या गाडीतून दोन्ही मूर्ती जप्त करण्यात आल्या. वराहअवताराच्या मूर्तीचे वजन 8 किलो 700 ग्रॅम तर लक्ष्मीच्या मूर्तीचे वजन 6 किलो 827 ग्रॅम इतके आहे. या मूर्ती आरोपींनी कुठुन चोरल्या हे अद्याप कळालेले नाही. म्हणून पोलिसांनी या मूर्ती पुरातत्व विभागाकडे सोपवल्या आहेत. त्याबाबत अहवाल आल्यानंतर आरोपींना योग्य ती शिक्षा केली जाईल.

























































