कात्रज परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयते, पिस्तूलासारखा लॉटर पिस्तूल, दोन मोबाईल आणि रोकड असा एकूण 13 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील चौगुले इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. विशाल जाधव (वय 32), गणेश चव्हाण (वय 23), सुनील वसवे (वय 23, सर्व रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक उत्तम नंदकुमार तारु (वय 40) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक बुधवारी कात्रज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चौगुले इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधारात वडाच्या झाडाखाली चौघेजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, मोबाईल, लॉटर पिस्तूल आढळले. चौकशीत त्यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.