हवाई दलाची ताकद वाढली, आणखी तीन राफेल हिंदुस्थानात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद वाढली आहे. बुधवारी आणखी तीन राफेल लढाऊ विमाने फ्रान्समधून गुजरातच्या जामनगर एअरबेसवर दाखल झाली. सकाळी हवेत झेपावलेल्या या विमानांनी सायंकाळपर्यंत 7364 किमीचा प्रवास नॉन-स्टॉप पूर्ण केला. त्यांच्या एण्ट्रीमुळे हिंदुस्थानातील राफेलची संख्या आठ झाली आहे. फ्रान्स पुढील दोन वर्षांत हिंदुस्थानशी करार केलेल्या सर्व 36 राफेलची उपलब्धता करणार आहे.

तीन राफेलच्या फ्रान्स ते हिंदुस्थान प्रवासात हवेतच इंधन भरणारे फ्रान्स हवाई दलाचे विशेष विमानही होते. यापूर्वी 29 जुलैला पाच राफेल दाखल झाली होती. त्या राफेल्सनी यूएईमध्ये थांबा घेतला होता. बुधवारी तीन राफेल्सनी नॉन-स्टॉप उड्डाणाची किमया करून दाखवली. हिंदुस्थानने 2016 मध्ये 36 राफेल विमाने मिळवण्यासाठी फ्रान्सशी 58 हजार कोटींचा करार केला होता. 36 पैकी 30 लढाऊ विमाने असतील, तर 6 विमाने प्रशिक्षणासाठी तैनात असतील. अण्वस्त्र्ा हल्ला करण्याची क्षमता राफेल विमानांमध्ये आहे. तसेच ही विमाने 100 किमी दूर अंतरावरचे लक्ष्य भेदू शकतात. यात आधुनिक शस्त्र्ाsही असतील. ही विमाने एकावेळी तब्बल साडेनऊ हजार किलो सामान नेऊ शकतात. पाकिस्तानसह लडाखच्या सीमेवर कुरापती सुरू ठेवणाऱया चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाच राफेल याआधी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल आहेत. त्यात आता आणखी तीन राफेलची भर पडणार असल्याने हवाई दलाची ताकद प्रचंड वाढली आहे.

z राफेल लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली बनवले जात आहे. हिंदुस्थानी हवाई दलाची आवश्यकता फ्रान्सच्या अधिकाऱयांनी विचारात घेतली आहे. दुसऱया कुणासाठी राखीव ठेवलेल्या साठय़ातून हिंदुस्थानला हॅमर देण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे.
z हॅमर (हायली एजाईल मॉडय़ूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज) हे मीडियम रेंज मिसाईल आहे. फ्रान्सचे हवाई दल आणि नौदलासाठी हॅमर बनवण्यात आले होते. लडाखच्या डोंगराळ भागातील शेल्टर आणि बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता या हॅमरमध्ये आहे. हिंदुस्थानला लडाखच्या सीमेवर याचा मोठा फायदा होऊ शकतो.