तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन अमेरिकन आणि एका ब्रिटनच्या शास्त्रज्ञाला या वर्षीचा प्रतिष्ठेचा वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मानवी शरीरातील पेशींमधील ऑक्सिजनचे महत्त्व आणि त्याची कार्यप्रणाली’वर या तीन शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ऍनिमिया, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांशी झगडणाऱया रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे. अमेरिकेतील डॉ. विल्यम जी. केलिन ज्युनियर, पीटर जे. रॅटक्लिक आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे ‘नोबेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.