भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी तीन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये एक वाहन चालकाचा समावेश आहे. याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी उद्यानासमोर एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली, अद्यापही त्याची ओळख पटू शकली नाही. त्याशिवाय एका वाहन चालकाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या केली तिसऱ्या घटनेत एकटाच राहणाऱ्या तरुणाने गळफास घेतला आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

वाहन चालक असलेला व्यक्ती महिणाभर बेरोजगार होता. त्याला मित्र दररोज जेवणाचा डबा देत होता. आज दुपारी तो डबा द्यायला आल्यावर ही घटना उघडकीस आली. तर दुसरी आत्महत्या केलेला व्यक्ती सुखसागरनगर येथे एकटीच राहत होता, त्याचा मित्र सतत फोन करत होता. मात्र फोन न उचलल्याने तो घरी गेल्यावर आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे.