पंधरा दिवसांत तीन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात गेल्या 15 दिवसांत तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. परदेशात जाण्याची संधी हुकल्याने तरुणाने, सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने आणि वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून सीएने आत्महत्या केली आहे. आत्महत्याप्रकरणी आग्रीपाडा, मुलुंड आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पहिली घटना मुलुंड येथे घडली. मुलुंड येथे एक 29 वर्षांचा तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी चहा आणि वडापावचे दुकान टाकले होते. त्या दुकानाशेजारी एका व्यक्तीने भाजीचा धंदा सुरू केला. ग्राहकांवरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मृत तरुणाला पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे होते. गुन्हा दाखल झाल्यास परदेशात जायची संधी हुकेल अशी त्या मृत तरुणाला भीती वाटत होती. अखेर भाजीवाल्याने त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे तरुणाने आत्महत्या करून एक सुसाईड नोट लिहिली. घडल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दुसरी घटना आग्रीपाडा येथे घडली. सीए झालेला तरुण आग्रीपाडा येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याच्या कार्यालयात काम करणारा वरिष्ठ अधिकारी हा त्याचा मानसिक छळ करत होता. या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.