पुलवामात उडाली चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

595

जम्मू कश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात मोठी चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले आहे. मृत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळी अजूनही चकमक सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामामधील त्राल भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मंगळवारी रात्री उशिरा त्रालमध्ये सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.

मृत दह्शतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. मंगळवारी जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने त्रालमध्ये ही मोहीम हाती घेतली. आयएसआय पुलावामा सारखा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. आएसआयने सर्व दहशतवादी संघटनांची एक संयुक्त टीम बनवली आहे, त्याचे नेतृत्व जैश ए मोहम्मद असून त्या टीमचे नाव गझनवी फोर्स असे ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या