तीन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून बनवला निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हयातील २८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मानवी साखळी उभारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह तयार केले. तसेच दिनांक २३ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन विद्यार्थांनी केले.

शिस्तबध्द रित्या शाळकरी मुले आणि मुलींनी मैदानावर आयोगाचे बोधचिन्ह साकारले. या सोहळयाला बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा लोगो तयार करुन मतदानाचा संदेश देताना एक विक्रम घडवला आहे असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

SVEEP कार्यक्रमाच्या प्रमुख असलेल्या  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदिंचा या कार्यक्रमास उपस्थिती होते. या उपक्रमात पटवर्धन हायस्कूल, शिर्के प्रशाला, फाटक प्रशाला, आय.टी.आय., सेक्रेट हार्ट कॉन्व्हेन्ट, एम.एस नाईक हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, जी.जी.पी.एस, सौ. गो.दा. जांभेकर विद्यालय, ए.के. देसाई हायस्कूल, मिस्त्री हायस्कूल, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, पॉलिटेक्नीक, रत्नागिरी, डी.एन.कॉलेज, सेंटथॉमस विद्यालय आदिंचे विद्यार्थी  आणि शिक्षक सहभागी झाले होते.