चंद्रपुरात रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

चंद्रपुरात रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाला आहे. मृत अस्वल मादी असून 3 वर्षाचे होते. चिचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मुल उपक्षेत्रातील, नियतक्षेत्रतील ही घटना आहे. मालगाडी रेल्वेच्या धडकेत पहाटेच्या सुमारास मुल कडून गोंदिया मार्गे जाणाऱ्या मुल- चीचोली गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका अस्वलाचा मृतदेह सापडला आहे.

रेल्वेची धडक बसल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृत अस्वलाला शविच्छेदनासाठी चिचपल्ली येथे नेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या